जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून सलमान खानने बिईंग ह्युमन या त्याच्या एनजीओ मार्फत ई- सायकलचे लॉन्च केले होते. आता नुकतेच सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओत तो आणि सोहेल खान सायकल चालवताना दिसत आहेत. पण यावरूनच आता सुलतानला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. सोमवारी ई- सायकल लॉन्चच्या कार्यक्रमावेळी सलमानने अपघातापासून वाचण्यासाठी रस्त्यांच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.

अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

सलमानच्या मते, कोणत्याही बाइकपेक्षा सायकल ही केव्हाही चांगली. हायवेवर लोकं फार वेगाने बाइक चालवतात त्यामुळे बाइक्समुळे जास्ती अपघात होतात. आम्ही फिल्मसिटीमध्ये शूटिंग करतो, मात्र तरुण ही स्टंटबाजी हायवेवर करताना दिसतात’ असं सलमान म्हणाला.

२००२ च्या हिट अँड रन प्रकरणात सलमान खान अडकला होता. फुटपाथवर झोपलेल्या एकाचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. या अपघातातून सलमानची निर्दोष सुटका झाली असली, तरी ट्विटरकरांनी त्याची खिल्ली उडवण्याची एक संधी सोडली नाही.

सलमान खानचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाइट’ २३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. अमेरिकन सिनेमा ‘लिटिल बॉय’च्या कथानकाचा आधार घेत दिग्दर्शक कबीर खानने सात वर्षांनंतर सलमान आणि सोहेल खानला रुपेरी पडद्यावर एकत्र आणले आहे. त्यामुळे या दोन्ही भावांच्या नात्यातील गोडवा प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याऱ्या या बहुचर्चित सिनेमात सलमान आणि सोहेलव्यतिरिक्त चीनी अभिनेत्री झू झू, बालकलाकार माटिन तंगू रे, ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आणि पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत अभिनेता शाहरुख खानही झळकणार आहे.

स्पृहा- गश्मीरला काहीच प्रॉब्लेम नाहीये…