बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान सध्या ‘ट्युबालाइट’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खानने केलंय. चित्रपटाच्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये सलमानचा भाऊ सोहेल खानसुद्धा भूमिका साकारणार आहे. सलमान आणि सोहेल चित्रपटाच्या गाणी आणि ट्रेलरमध्ये तर झळकतच आहेतच. मात्र, ‘ट्युबलाइट’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा बालकलाकार माटिन रे तंगू आणि चीनी अभिनेत्री झू झू यांची क्वचितच झलक पाहायला मिळाली.

त्यातीच कसर या चित्रपटाच्या बिहाइंड सीन्स व्हिडिओ आणि फोटोंमधून भरुन निघत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोमध्ये सलमान माटिनसोबत बसून चहा-कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहे आणि दिग्दर्शक कबीर खान माटिनला चित्रपटातील दृश्य समजावून सांगत आहेत. कबीर खानच्या मागे अभिनेत्री झू झूचीही झलक या फोटोमध्ये पाहायला मिळतेय.

https://www.instagram.com/p/BVRc0X0DTuY/

https://www.instagram.com/p/BVRscLigR0H/

चित्रपटातील आणखी एका फोटोमध्ये सलमान आणि कबीर खान दिसत आहेत ज्यामध्ये चहा-कॉफीचा कप हातात घेऊन सलमान उभा आहे आणि कबीर खान नयनरम्य निसर्गाला अनुभवत आहेत. लहान मुलांबाबत सलमान खानला विशेष आकर्षण आहे हे आपल्याला नेहमीच दिसून येते. त्यांच्यासोबत वेळ घालवणे सलमानला नेहमीच आवडते. मंगळवारी सलमानने माटिनसोबतच्या अशा एका क्षणाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यामध्ये सलमान- माटिनला सायकलची सफर करताना दिसत आहेत. ‘मी आणि माझा माटिन’ असं कॅप्शनदेखील सलमानने या फोटोखाली दिलंय.

PHOTOS : प्रागमध्ये देसी गर्लचा ‘व्हेकेशन मोड ऑन’

‘ट्युबलाइट’चे चित्रीकरण लडाख, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. चित्रपटात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी, बालकलाकार माटिन रे तंगू, सोहेल खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असून, शाहरुख खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.

Story img Loader