झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गायत्री दातारला सोशल मीडियावर वाईट अनुभव आला. एका महिलेने गायत्रीच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील मेसेज पोस्ट केला. या मेसेजचा स्क्रिनशॉट गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.

‘नुकताच हा मेसेज फेजबुक पेजवर वाचला आणि मला धक्काच बसला. हे असं बोलण्याची गरज आहे का ? हे योग्य आहे का?,’ असं गायत्रीने लिहिलं. पुढे तिने म्हटलं की, मी अशा मेसेजची प्रसिद्धी करत नाहीये. पण इथे त्या व्यक्तीचा फेसबुक अकाऊंट आहे. तिच्याविरोधात आवाज उठवा. आपली ताकद दाखवूयात, अशा शब्दांत गायत्रीने चाहत्यांना आवाहन केलं आहे. आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या महिलेचा अकाऊंट खरा आहे की खोटा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या महिलेने कशामुळे गायत्रीला असा मेसेज पाठवला हेसुद्धा समजू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायत्रीने ‘तुला पाहते रे’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेनंतर ती रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या व्यावसायिक नाटकाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती ‘कोल्हापूर डायरिज’ या चित्रपटातही झळकणार आहे.