‘उतरण’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. तिने अभिनयाच्या जोरावार कलाविश्वामध्ये स्वत:चे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या १३व्या पर्वामध्ये सहभागी झाल्याने रश्मी चर्चेत आहे. तिचे सिद्धार्थ शुक्लासोबतचे नाते आणि अरहान खानसोबतचे अफेर या सर्वाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल करण्यात आले आहे. पण रश्मीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

रश्मीने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला कपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्यांना चांगले सुनावले आहे. ‘मला अनेकदा माझी साइज, मेकअप, कपडे, केस आणि लो क्लीवेजमुळे ट्रोल करण्यात आले. मी अशा लोकांपैकी एक आहे ज्यांचे वजन सतत वाढत असते आणि कमी होत असते. लोकांना या गोष्टीची देखील समस्या आहे. अनेकदा लोकांना माझे कपडे आणि नृत्यही आवडत नाही’ असे रश्मी म्हणाली.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

त्यानंतर तिने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले ‘मला ट्रोल करणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छिते की हे माझे शरीर आहे आणि माझ्या मर्जी प्रमाणे मला योग्य वाटेत ते मी माझ्या शरीरासोबत करेन… यावर केवळ माझा अधिकार आहे’ असे ती म्हणाली.

रश्मीने नंतर मिळणाऱ्या मानधनावर ही वक्तव्य केले आहे. ‘जर एखाद्या अभिनेत्याला जास्त पैसे मिळत असतील तर ती त्याची मेहनत आहे. मी त्यावर प्रश्न उपस्थित करु शकत नाही. पण मला तेच मिळते ज्यावर माझा हक्क आहे’ असे रश्मी पुढे म्हणाली.