सोशल मीडिया, आंतरराष्ट्रीय फॅशन जगत आणि कलाविश्वात चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री किम कर्दाशियाँ आणि केन्ये वेस्ट यांच्या आयुष्यात एका तान्हुलीचे आगमन झाले आहे. किम आणि केन्येच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून या नव्या पाहुणीचे आगमन झाले असून, तिने एका ब्लॉगच्या माध्यमातून, याविषयीची माहिती दिली.

‘केन्ये आणि मला हे सांगताना फारच आनंद होतोय, की आमच्या आयुष्यात गोंडस चिमुरडीचं आगमन झालं आहे. सर्व स्वप्न साकार करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही दोघंही त्या सरोगेटचे आभारी आहोत. तिची काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचेही आम्ही आभार मानतो. नॉर्थ आणि सेंटसुद्धा त्यांच्या लहान बहिणीच्या येण्चाने खूपच आनंदात असून तिच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत’, असे किमने तिच्या ब्लॉगमध्ये लिहिले.

किम आणि केन्येच्या आयुष्यात याआधी नॉर्थ आणि सेंट नावाची दोन मुलं आहेत. सप्टेंबरमध्येच किमने ती तिसऱ्यांदा आई होण्याच्या तयारीत असल्याचे जाहीर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमने तिच्या मुलीसाठी आतापासूनच नवी खेळणी खरेदी करण्यास सुरुवात केली असून १. ८३ कोटी इतकी किंमत असणाऱ्या लुईव वुईटनच्या टेडी बेअरचाही समावेश आहे.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना