छोट्या पडद्यावरील लोकप्रिय निर्माती म्हणून एकता कपूरकडे पाहिले जाते. तिने आजवर अनेक मालिका आणि सीरिजची निर्मिती केली आहे. एकता कपूर टेलिव्हिजन क्वीन म्हणून देखील ओळखली जाते. आज ७ जून रोजी एकताचा वाढदिवस आहे. ती ४६ वर्षांची झाली आहे. पण एकताने अद्याप लग्न केलेले नाही. तिने लग्न का केले नाही असा प्रश्न अनेकदा तिला विचारला जातो. एका मुलाखतीमध्ये तिला लग्न का केले नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

एकता कपूरने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. तिच्या काही मालिक संपून जवळपास १० ते १५ वर्षे उलटली आहेत. तरी देखील त्या मालिकांमधील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन असल्याचे पाहायला मिळते. एकता कपूर आता ४६ वर्षांची झाली आहे. ती कधी लग्न करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिला ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर एकताने मजेशीर अंदाजात उत्तर दिले होते. त्यावेळी तिने बॉलिवूडचा भाईजान सलमान खान जेव्हा लग्न करणार तेव्हा त्याच्या दोन वर्षांनंतर ती लग्न करणार असल्याचे सांगितले होते. ‘मी लग्न करणार. सल्लू भाईच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर’ असे तिने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.

Jupiter and Venus will unite after 24 years
आर्थिक समस्या उद्भवणार? २४ वर्षानंतर गुरु आणि शुक्र एकत्र होणार अस्त; ‘या’ राशीच्या व्यक्तींचे भाग्य देणार नाही साथ
Bansuri Swaraj underlines this message My mother’s daughter
सुषमा स्वराज यांचेच माझ्यावर संस्कार, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार; बन्सुरी स्वराज यांची भावनिक साद
Sharad pawar on Udyanraje bhosale lok sabha election
“राजेंबद्दल आम्ही प्रजा…”, उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, भाजपाला टोला
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न

आणखी वाचा : जिथे लहानशा खोलीत बालपण घालवलं, त्याच शहरात नेहानं घेतला आलिशान बंगला!

एकता कपूरने तिच्या करिअरची सुरुवात १९९५मध्ये सुरु केल्याचे म्हटले जाते. आज ती टीव्ही क्वीन म्हणून ओळखली जाते. तिच्या मालिका सर्वाधिक पाहिल्या जातात. आज एकताचा ४६वा वाढदिवस आहे आणि तिने तिच्या करिअरमध्ये ४० पेक्षा जास्त मालिका तसेच अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

तिच्या ‘हम पांच’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसौदी जिंदगी की’, ‘कहानी घर-घर की’ आणि ‘नागिन’ या मालिका विशेष गाजल्या. तसेच या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री स्मृति ईराणी, साक्षी तन्वर, श्वेता तिवारी, मौनी रॉय यांचे संपूर्ण आयुष्य एकता कपूरने बदलून टाकले.