छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेला लोकप्रिय शो म्हणजे इंडियन आयडॉल 2020. या शोमधील स्पर्धकांनी त्यांच्या सुरेल आवाजाने साऱ्यांनाच वेड लावलं आहे. विशेष म्हणजे केवळ श्रोतेमंडळीच नव्हे तर त्यांच्या आवाजामुळे काही सेलिब्रिटीदेखील दंग झाले आहेत. त्यामुळेच अलिकडे झालेल्या भागात लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे याने इंडियन आयडॉल 2020 च्या मंचावर हजेरी लावत स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला.

अलिकडेच झालेल्या वीकएण्डच्या भागात अंजली आणि नचिकेत या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुबोध भावेने इंडियन आयडॉल 2020 मध्ये हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यावेळी सुबोधने नचिकेतला एक खास भेटवस्तूदेखील दिली.

वीकएण्डच्या भागात अंजली आणि नचिकेतने सादर केलेल्या गाण्यामुळे सुबोध मंत्रमुग्ध झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचसोबत नचिकेत कायम त्याच्या गाण्यातून रंगमंच आणि मराठी संस्कृती यांचं दर्शन घडवत असल्यामुळे सुबोधने त्याला नाटकाच्या प्रारंभी वाजविण्यात येणार एक घंटा (बेल) भेट म्हणून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुबोध भावेंनी केलेल्या कौतुकामुळे आम्ही खरंच खूप भारावून गेलो आहोत. बऱ्याच वर्षांपासून आम्ही त्यांना रुपेरी पडद्यावर पाहात आहोत. पण आज त्यांच्याकडून हे कौतुकाचे बोल ऐकल्यावर फार आनंद होतो. मी सुबोध भावेंचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे त्यांना या मंचावर पाहून माझा आनंद गगनात मावत नाहीये, असं नचिकेत म्हणाला.