अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाविरोधात ग्राहकांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून तिला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे. ग्राहकांना एका प्रकल्पात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांना फसवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विंकल एका प्रकल्पाच्या जाहिरातीत झळकली. मात्र त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सात ग्राहकांना जागेचा ताबा न मिळाल्याने त्यांनी तक्रार दाखल केली. ट्विंकल केवळ जाहिरातीतच झळकली नाही तर तिने फ्लॅट्स घेण्यासाठी ग्राहकांची दिशाभूलही केली. कारण ती स्वत: त्या प्रकल्पाची आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर आहे. फ्लॅट्सच्या विक्रीची जबाबदारी तिने घेतली होती. मात्र वेळेत गुंतवणूक केलेल्यांना ताबा न मिळाल्याने आता ट्विंकलला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

वाचा : ‘पद्मावती’विरोधात चित्तोडगडावर जमणार राजपूत संघटना

अक्षय कुमारच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या माध्यमातून ट्विंकल निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यामध्ये अक्षयसोबतच राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून २५ जानेवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.