हैदराबाद पोलिसांनी दोन सिनेअभिनेत्रींना देह व्यापाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यापार चालतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला असता त्यांनी दोन अभिनेत्रींसह चार लोकांना अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एक अभिनेत्री तामिळ सिनेमात काम करते तर दुसरी बंगाली टीव्ही मालिकांमध्ये काम करते. पोलिसांनी सांगितले की, बंजारा हिल्स या उच्चभ्रू परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी छापा टाकला. यावेळी त्यांना रोख ५५ हजार रुपये आणि अनेक मोबाइल फोन मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दोन दलालांनाही अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी एकाने सांगितले की, ते मुंबईतील अभिनेत्रींनाही इथे घेऊन यायचे. पंजगट्टा पोलिस ठाण्यातील अधिकारी एस. रविंदर यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना त्या हॉटेलमध्ये देहव्यापार चालत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरूनच पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा टाकला. यानंतर इतर हॉटेलमधून दोन अभिनेत्रींना अटक केली.