कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल मंगळवारी लागला. या निकालानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्लूलर या पक्षाने आघाडी करत भाजपाला धक्का दिला आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर अभिनेता उदय चोप्राने केलेलं एक ट्विट त्याला चांगलंच महागात पडलं. भाजपाच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींवरून उदयने कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्याविषयी ट्विट केलं.

‘नुकतंच मी कर्नाटकच्या राज्यपालांविषयी गुगलवर सर्च केलं. ते भाजपा आणि संघाशी निगडीत आहेत अशी माहिती समोर आली. त्यामुळे मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आता काय होणार आहे,’ असं ट्विट त्याने काल (मंगळवारी) संध्याकाळी केलं. उदयच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं.

https://twitter.com/udaychopra/status/996352400272363520

काहींनी त्याला कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बॉलिवूड आणि राजकारण हे दोन वेगवेगळे विषय असून यांच्यात गोंधळ न घालण्याचा सल्ला दिला.