मासिक पाळी, त्या दिवसांमध्ये घेतली जाणारी काळजी आणि सॅनिटरी नॅपकिन्स यावर फार क्वचितच बोलले जाते. मासिक पाळी हा विषय घरातील एका कोपऱ्यात बसून बोलण्यासारखा आहे, असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे बऱ्याचदा स्त्रिया उघडपणे यावर बोलणे टाळतात. पण, आपल्या शरीरासोबतच पर्यावरणाचीही काळजी घेणे महत्त्वाचे असते हे अभिनेत्री दिया मिर्झा हिने स्पष्ट केले.

अॅडलेड ओवलमध्ये लग्नगाठ बांधण्यासाठी विराट- अनुष्काला आले बोलावणे

संयुक्त राष्ट्राची पर्यावरण राजदूत म्हणून दियाची नियुक्ती करण्यात आली आहे. सॅनिटरी नॅपकिन्समुळे प्रदूषण होत असल्याने मासिक पाळीत मी त्यांचा वापर करत नाही असे दियाने म्हटले. ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, आपल्याकडे सर्वाधिक प्रदूषण प्लास्टिक, सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्समुळे होते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात मी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करणे टाळले आहे. मी स्वतः अभिनेत्री असल्यामुळे असे वक्तव्य करतेय याचाच अर्थ ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेकदा मला याच्या जाहिरातीसाठी विचारले जाते मात्र मी त्यास साफ नकार देते. सॅनिटरी नॅपकिनऐवजी विघटनशील नॅपकिनचा वापर करण्याचा सल्ला यावेळी दियाने दिला.

मी आता विघटनशील नॅपकिनचा वापर करते. या नॅपकिन्सचे नैसर्गिकरित्या विघटन होते याची मी १०० टक्की खात्री देते. बऱ्याच वर्षांपूर्वी स्त्रिया मासिक पाळीत कपड्याचा वापर करत होत्या. त्यानंतर यासाठी आलेल्या पर्यायी गोष्टी या पर्यावरणासाठी घातक आहेत. त्यामुळे महिलांनी सॅनिटरी नॅपकिन्स न वापरता शरीराला अपायकारक नसणाऱ्या पर्यावरणपूरक नॅपकिन्सचा वापर करावा, असे दिया म्हणाली.

चित्रपटाच्या शुटींगचे दोन कोटी रूपये घेऊन स्पॉटबॉय फरार

दिया रोजच्या वापरातही प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करत नाही. प्लास्टिक ब्रशऐवजी बांबूचा ब्रश, पाणी पिण्यासाठी मेटलची बॉटल ती वापरते. प्रदूषण टाळण्यासाठी दियाने उचललेले हे पाऊल नक्कीच प्रशंसनीय आहे.