लोकप्रिय सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी दुबईत हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोहित मारवाह आणि अंतरा मोतीवाला यांच्या लग्नसमारंभासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूरबरोबर दुबईला गेल्या होत्या. बोनी आणि श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी ही ‘धडक’ या तिच्या पहिल्या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने कुटुंबियांसोबत दुबईला जाऊ शकली नव्हती.

बोनी कपूर यांची पहिली पत्नी आणि अभिनेता अर्जून कपूरची आई मोना शौरी-कपूर यांचा वयाच्या ४८व्या वर्षी मृत्यू झाला. याला नियतीचा खेळ म्हणता येईल किंवा दुर्दैवी योगायोग, कारण मोना आणि श्रीदेवी या दोघांच्या मृत्यूसंदर्भात एक विचित्र साम्य आढळून आले आहे. ज्याप्रमाणे मोना यांचे आपल्या मुलाचा म्हणजेच अर्जूनचा पहिला सिनेमा पाहण्याआधीच निधन झाले त्याचप्रमाणे जान्हवीचा पहिला सिनेमा पाहण्याआधीच श्रीदेवी यांचेही आकस्मात निधन झाले.

वाचा : ‘ख्वाबों की शहजादी’ निघून जाते तेव्हा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जून कपूरचा ‘इश्कजादे’ हा पहिला सिनेमा २०१२ साली मे महिन्यात प्रदर्शित झाला. मात्र त्याआआधीच म्हणजे २५ मार्च २०१२ रोजी मोना यांचे निधन झाले. श्रीदेवी यांच्याबद्दलही असेच काहीसे घडले. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीचा ‘धडक’ हा पहिलावहिला सिनेमा जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच श्रीदेवी यांचे निधन अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांनी ट्विटवरही आपल्या मुलीच्या सिनेमाचा पोस्टर ‘पीन’ ट्विट करुन ठेवला आहे. यावरूनच त्या आपल्या मुलीच्या पहिल्या सिनेमाची किती आतुरतेने वाट पाहत होत्या हे सहज स्पष्ट होत आहे.