बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेण्टमध्ये शनिवारी रात्री एक व्यक्ती घुसला होता. त्यानंतर अवघ्या काही वेळातच त्याच्या अपार्टमेण्टमध्ये खळबळ उडालेली. त्यानंतर पोलिसांनाही बोलवण्यात आले. मात्र, काही वेळानंतरच त्या व्यक्तीची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी अपार्टमेण्टमध्ये घुसलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद शिराजुद्दीन असून तो २५ वर्षांचा आहे. गेटवरील सुरक्षारक्षक काही वेळासाठी त्यांच्या जागेवरून दुसरीकडे गेले होते. हीच संधी साधत मोहम्मदने सलमानच्या अपार्टमेण्टमध्ये शिरकाव केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो व्यक्ती अपार्टमेण्टमधील टॉयलेटचा वापर करताना आढळला. त्यानंतर तेथे असलेल्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी सुरक्षारक्षकाला याची माहिती दिली आणि लगेचच पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर कळलं की मोहम्मदची मानसिक स्थिती ठीक नाहीये. त्यामुळे त्याच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल न करता त्याला सोडण्यात आले.

वाचा : सलमानच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन

मोहम्मदला कोणत्याही व्यक्तीला दुखापत करायची नव्हती. तसेच, तो अपार्टमेण्टमध्ये जरी घुसला असला तरी त्याने सलमानच्या घरात जाण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. याचा अर्थ तो चोरीच्या उद्देशाने आला नव्हता हेही सिद्ध झाले.

वाचा : शाहरूखच्या मुलावर होणार शस्त्रक्रिया

दरम्यान, सलमान सध्या त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी करत आहे. त्याच्या बिइंग ह्युमन वेबसाईटद्वारे ई सायकलचे काही दिवसांपूर्वीच अनावरण करण्यात आले.