‘बिग बॉस ओटीटी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय शो आहे. या शोमधून पहिल्याच आठवड्यात उर्फी जावेद बाहेर पडली. त्यानंतर तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी उर्फीचे विमानतळावरील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी उर्फीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. त्यावेळी उर्फीने डेनिम जीन्स आणि त्यावर एक क्रॉप डेनिम शर्ट परिधान केले होते. मात्र हे शर्ट इतकं छोटं होतं की यातून उर्फीची ब्रा स्पष्ट दिसत होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले होते. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सतत ट्रोल केल्यानंतर आता उर्फीने तिच्या या ट्रोलिंगचा संबंघ तिच्या धर्माशी असल्याचे म्हटले आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि आणखी व्यक्ती उर्फीचा ब्रामधला तो फोटो घेऊन उभे आहेत. या फोटोवर लिहिले आहे की, ‘या गरीब मुलीसाठी दान करा, जेने करून ती हिजाब आणि नकाब घेऊ शकेल.’ यावर कमेंट करत उर्फी म्हणाली, ‘मी मुस्लीम असल्यामुळे मला ट्रोल आणि टार्गेट केले जात आहे?’
आणखी वाचा : …म्हणून सिद्धार्थची आई घेते शेहनाजची काळजी
उर्फीच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘मॉर्डन भिकारी’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अरे कुणाकडे जुने कपडे असतील तर या गरिबांना द्या.’ तर आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘एकतर ब्रा दाखव किंवा जॅकेट, काय पाहावं यात लोकांचा गोंधळ उडतोय’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. त्यानंतर ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ‘पब्लिसिटी स्टंट करायचा असता तर मी काही न घालता गेले असते,’ असे उर्फी म्हणाली.