‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली. विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. बॉक्स ऑफीसवर ‘उरी’ला चांगला प्रतिसाद मिळत असून पाच दिवसांत चित्रपटाने ५० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. ११ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी तब्बल ८.२५ कोटींची कमाई केली होती. तर, पहिल्या शनिवारी १२.२५ कोटी आणि रविवारी १५ कोटींची कमाई केली होती. सोमवारी ‘उरी’नं १० कोटींचा गल्ला जमवला. पुढील किमान एक आठवडा तरी ‘उरी’ची घोडदौड अशीच सुरू राहील, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.

Video : ‘राजश्री प्रॉडक्शन्स’च्या ‘हम चार’चा ट्रेलर पाहिलात का?

उरीसोबत प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांनी थंड प्रतिसाद दिला आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत केवळ १४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Story img Loader