बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आगामी ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात उर्वशी एका अनोख्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार असून त्यासाठी तिने मानधनाची रक्कमसुद्धा वाढवल्याचं कळतंय. इतर कलाकारांच्या तुलनेत उर्वशीने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेतली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशीने ‘व्हर्जिन भानुप्रिया’साठी तब्बल सात कोटी रुपये मानधन घेतले आहे. याशिवाय उर्वशीला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाच्या सीक्वेलची ऑफर मिळाली होती. मात्र तारीख उपलब्ध नसल्याने तिने या चित्रपटाला नकार दिला.

https://www.instagram.com/p/CCakp8NBmPB/

उर्वशीचा ‘व्हर्जिन भानुप्रिया’ हा चित्रपट येत्या १६ जुलै रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासोबतच गौतम गुलाटी, अर्चना पुरण सिंग, डेल्नाज इरानी, राजीव गुप्ता, निकी अनेजा वालिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

काही दिवसांपूर्वीच उर्वशीच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. तिने लग्न केल्याची जोरदार चर्चा नेटकऱ्यांमध्ये होती. मात्र हा फोटो या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा असल्याचं नंतर स्पष्ट झालं. उर्वशीने मॉडेलिंग करत करिअरची सुरुवात केली. ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने बरेच आयटम साँगसुद्धा केले आहेत.