अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हान्का ट्रम्प आणि जावईदेखील आले होते. या दौऱ्यामध्ये इव्हान्का ट्रम्प यांची सर्वाधिक चर्चेत राहिल्या. अगदी त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या हेअर स्टाइलपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे इव्हान्का यांना भारतामध्ये आल्यानंतर त्यांचा मेकअप कोणी केला असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता. विशेष म्हणजे इव्हान्का यांचा मेकअप अभिनेत्री करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्या मेकअप आर्टिस्टने केल्याचं सांगण्यात येत आहे.

भारत दौऱ्यावर असताना इव्हान्का यांनी अनेक ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांच्या सौंदर्याची अनेकांनी प्रशंसा केली. मात्र त्यांचा मेकओव्हर करण्यामध्ये बॉलिवूडमधील एका नावाजलेल्या मेकअप आर्टिस्टचा हात असल्याचं समोर आलं आहे. या मेकअप आर्टिस्टने इव्हान्का ट्रम्प यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ही माहिती दिली.

बॉलिवूडमधील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट अनु कौशिक यांनी इव्हान्का ट्रम्प यांचा मेकअप केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर इव्हान्का यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. अनु कौशिक या लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट असून त्यांनी प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय-बच्चन, करीना कपूर यासारख्या अनेक सेलिब्रिटींचा मेकअप केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : ट्रम्प यांची मुलगी इव्हान्का परिधान करुन आली वर्षभरापूर्वीचा ड्रेस; जाणून घ्या किंमत

दरम्यान, इव्हान्का यांनी हैदराबादमध्ये जो ड्रेस परिधान केला होता. तो अनिता डोंगरे यांनी डिझाइन केला होता. अनिता या बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅशन डिझायनर आहेत.