रामायण या मालिकेनंतर दूरदर्शन वाहिनीने लव कुश आणि श्रीकृष्ण या पौराणिक मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मालिका ९०च्या दशकातील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक होत्या. ‘लव कुश’ ही मालिका ‘उत्तर रामायण’ म्हणून ओळखली जाते. ही मालिका १९ एप्रिल पासून रात्री ९ वाजता पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशीने कुश ही भूमिका साकारली होती. आता स्वप्निलनने मालिकेसंबंधीत खुलासा केला आहे.

स्वप्निल जोशीने लव कुश ही मालिका पुन्हा प्रदर्शित होणार हे कळताच एक ट्विट केले आहे. हे ट्विट करत त्याने या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. ‘कुश ही माझी पहिली भूमिका. रामायणाच्या यशानंतर दूरदर्शनने लव कुश ही मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. १९ एप्रिलपासून रात्री ९ वाजता ही मालिका प्रदर्शित होणार आहे’ असे त्याने ट्विट केले आहे.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

स्वप्निलने त्याचे हे ट्विट रामायणातील राम अरुण गोविल आणि सीता दीपिका चिखलीया यांना टॅग केले आहे. त्याच्या ट्विटवर दीपिका यांनी ‘जय श्री राम, मस्त स्वप्निल’ असा रिप्लाय देखील दिला आहे. त्यांच्या या उत्तरावर स्वप्निलने ‘माताजी.. प्रणाम’ असे उत्तर दिले आहे.

स्वप्निलने केवळ लव कुश या मालिकेतच नव्हे तर रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण या मालिकेत देखील मुख्य भूमिका साकारली होती. स्वप्निलच्या या ट्विटवर एका चाहत्याने, ‘मी जेव्हा कृष्णाचा विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तु उभा राहतोस’ असे म्हटले आहे.