बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल काल अलिबागच्या ‘द मॅन्शन हाऊस’मध्ये विवाहबद्ध झाले. वरुण आणि नताशा शाळेत असल्यापासून परस्परांना ओळखत होते. पण कॉलेजच्या दिवसापासून त्यांच्यामध्ये प्रेमाचे नाते फुलण्यास सुरुवात झाली.
वरुण नताशाचं अलिबागमध्ये लग्न: ‘द मॅन्शन हाऊस’चं एका दिवसाचं भाडं ऐकून विस्फारतील डोळे
अखेर २४ जानेवारीला ते आयुष्यभरासाठी विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर आता वरुण-नताशाचे जुने फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. तेव्हा आणि आता, असे जुने आणि नवीन फोटो व्हायरल झाले आहेत. वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर चाहत्यांनीच जुने आणि नवीन फोटो एकत्र करुन, व्हायरल केले आहेत. लग्नाचा आणि कॉलेजच्या दिवसांमधला फोटो एकत्र करण्यात आला आहे.
View this post on Instagram
‘या’ दिवशी होणार लग्नाची रिसेप्शन पार्टी
काल (२४ जानेवारी) अलिबागमध्ये या दोघांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली. करोना पार्श्वभूमीवर या लग्नसोहळ्याला केवळ ५० जणांचा आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, कलाविश्वातील अन्य सेलिब्रिटी आणि दिग्गजांसाठी लवकरच एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
करोना काळ असल्यामुळे वरुण आणि नताशा यांना अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. मात्र, लवकरच ते अन्य सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये या पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.