अडचणीच्या आणि आनंदाच्या काळात एकमेकींची साथ देणाऱ्या चार मैत्रिणींची कथा आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. करिना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांची भूमिका असलेल्या या चित्रपटातील तिसरं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रत्येक ‘ब्राईड टू बी’साठी परफेक्ट ठरणाऱ्या या गाण्याचं शीर्षक ‘लाज शरम’ असं आहे.

खरंतर लग्नाची तयारी आणि शॉपिंग करण्यासाठी प्रत्येक मुलगी उत्सुक असते, पण इथे चित्र थोडं वेगळंच आहे. होणाऱ्या सासूच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि लग्नाबद्दल करिनाच्या स्वत:च्या असलेल्या अपेक्षा यामध्ये मेळ साधताना होणारा गोंधळ या गाण्यातून दाखवण्यात आला आहे. अशा वेळी सोनम, स्वरा आणि शिखा या तिच्या मैत्रिणी तिचा ताण दूर करण्याचा प्रयत्न करतात.

xenotransplantation
डुकराची किडनी प्रत्यारोपित केलेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू; विज्ञानाचा चमत्कार मानले जाणारे झेनोट्रांसप्लांटेशन आहे तरी काय?
loksatta kutuhal deep blue computer beats world chess champion garry kasparov
कुतूहल : ‘डीप ब्लू’ला ‘कृत्रिम बुद्धी’ होती?
nigerian national arrested with 77 cocaine capsules
अमली पदार्थांची तस्करी प्रकरणी परदेशी व्यक्तीला अटक; पोटातून बाहेर काढल्या १५ कोटीच्या कोकेनच्या ७७ कॅप्सूल
Women Manipur violence Update
Manipur Violence : “पीडित महिला पोलिसांच्या वाहनात बसल्या, पण…”; नग्न धिंडप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
panvel sexual abuse marathi news,
पनवेल: शेजारच्याकडून बालिकेवर अत्याचार, उलव्यातील घटना
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!

वाचा : ‘रेस ३’च्या या डायलॉगमुळे ट्रोल होतेय डेझी शहा

दिव्या कुमार आणि जसलिन रॉयल यांच्या आवाजातील हे गाणं व्हाईट हाऊसकडून संगीतबद्ध करण्यात आलं आहे. एकता कपूर आणि सोनमची बहिण रिया कपूर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक घोषने केलं आहे. लव्ह, लग्न आणि लोचामध्ये अडकलेल्या या चौघींच्या आयुष्याची मजेशीर कहाणी यात मांडण्यात आली आहे. बोल्ड संवाद आणि हटके कथानक घेऊन ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट येत्या १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.