पहिलावहिला मानाचा ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१७’ ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१७’ अभिनेत्री अमृता सुभाष यांना नुकताच प्रदान करण्यात आला. शनिवारी दिनानाथ नाट्यगृहात पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना रेखा आणि अमृता या दोघींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. यावेळी रेखा यांनी ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ हे गाणेही गायले. त्यांना साथ देत अमृतानेही मोठ्या उत्साहाने हे गाणे सादर केले. कलाकारांचा उत्साह, दिग्गजांची उपस्थिती आणि सोबतीला स्मिता पाटील यांच्या असंख्य आठवणी अशा एकंदर वातावरणात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बरसुद्धा उपस्थित होता.

Sharad Pawar, campaigner, Udayanraje,
शरद पवारच माझे मुख्य प्रचारक – उदयनराजे
Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार

पुरस्कार प्रदान सोहळा पार पडल्यानंतर अमृता सुभाषने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन रेखांसोबतचा एक फोटो पोस्ट केला. आपला आनंद व्यक्त करत अमृताने हा फोटो पोस्ट केला असून, त्यात रेखा आणि ती एकमेकींना आलिंगन देताना दिसत आहेत. एक सौंदर्याची खाण, तर एक रंगमंचाची चाहती, दोघीही त्यांच्या क्षेत्रात तोडीस तोड कामगिरी करणाऱ्या अभिनेत्री. त्यामुळे वेगवेगळ्या दशकांत आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्रींना अशा प्रकारे एकत्र पाहून प्रेक्षकांनाही फारच आनंद झाला. कलाविश्वात स्मिता पाटील यांचे योगदान आजही आदर्श समजले जाते. त्यांच्या चाहता वर्ग तसूभरही कमी झालेला नाही. किंबहुना आजच्या तरुणाईवरही स्मिता पाटील यांचा प्रभाव पाहायला मिळतो. स्मिता पाटील यांची कामगिरी आणि त्यांच्या आठवणींना स्मरुन चाहत्यांनी एकत्र येऊन या वर्षीपासून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…