संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी चर्चांना सुरुवात झाली. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूरचा लूक, ट्रेलर, पोस्टर्स यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहेच. पण, दीपिकाच्या ‘घुमर’ गाण्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता एका वेगळ्या पातळीला नेऊन ठेवली आहे. या गाण्याला आतापर्यंत युट्यूबवर सव्वा चार कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्यातील दीपिकाच्या राजेशाही लूकवरून तर कोणाच्याच नजरा हटत नाहीयेत. पण, विचार करा या गाण्यावर जर बेयॉन्से आणि शकिरा नाचताना तुम्हाला दिसल्या तर…. तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही ना….

वाचा : प्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

तसं पाहिलं तर एखाद्या बॉलिवूड गाण्यावर आणि तेही पारंपरिक नृत्यशैलीमध्ये बेयॉन्से आणि शकिरा नाचणे काहीसे अशक्यच आहे. पण, एका सोशल मीडिया युजरने ही अशक्य गोष्ट त्याच्या डोकॅलिटीने शक्य करून दाखवली. या युजरने ‘ब्युटिफुल लायर’ आणि ‘घुमर’ गाण्याचे अफलातून मॅशअप तयार केलेय. विशेष म्हणजे या दोन्ही आंतरराष्ट्रीय गायिका खरोखरंच ‘घुमर’वर डान्स करत असल्याचे एका क्षणाला आपल्याला वाटते.

वाचा : काजोलचं पहिलं प्रेम माहितीये का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. एकीकडे प्रदर्शनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असताना चित्रपटाला विरोध वाढतोय. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरच भन्साळी यांच्या मुंबईतील जुहू इथल्या कार्यालयाबाहेर पोलीस सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जुहू येथे एकता कपूरच्या बंगल्याजवळच भन्साळींचं कार्यालय आहे. बुधवारी रात्रीपासूनच मुंबई पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा पुरवली होती. गुरुवारीदेखील कार्यालयाबाहेर १५ ते १६ पोलीस पाहायला मिळाले. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत २४ तास ही पोलीस सुरक्षा तैनात असणार असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिली.