क्रिकेटपटू विराट कोहली मैदानातील फलंदाजी आणि मैदानाबाहेरही अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. तसेच तो आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यातही मागे पडत नाही. शनिवारी टी-२० सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर काल भारतीय उच्च आयुक्तालयाने एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी विराटने चक्क माइकचा ताबा घेतला आणि ‘ताज महल’ चित्रपटातील ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ हे गाणे गाण्यास सुरुवात केली.
विराट कोहली मंचावर गाणे गात असतानाचा व्डिडिओ युवराज सिंगने शूट केला होता. त्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर प्रसिद्ध केला असून यासाठी विराटने त्याचे आभार मानले आहेत. या गाण्याविषयी विराट म्हणाला की, लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे मला फार आवडते. विराटचा हा व्हिडिओ पाहून या गाण्यातून आपले अजूनही अनुष्कावर प्रेम असल्याचे विराटला सिध्द तर करायचे नाही ? असा प्रश्न नक्कीच त्याच्या चाहत्यांना पडला असेल. अनुष्का या व्हिडिओवर काही प्रतिक्रिया देते का, हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे राहिल.
संग्रहित लेख, दिनांक 29th Feb 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: ‘जो वादा किया वो निभाना पडेगा…’ विराटचा अनुष्काला संदेश?
विराटने चक्क माइकचा ताबा घेतला.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 29-02-2016 at 17:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video is virat kohlis jo waada kiya wo nibhana padega song a message to anushka sharma