सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे सध्या सर्वत्र कविता लक्ष्मी हेच नाव अनेकांच्या तोंडावर ऐकायला मिळत आहे. मल्याळम अभिनेत्री कविता ही ‘स्त्रीधनम’ या मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. पण, गेल्या काही काळापासून ही अभिनेत्री अभिनय न करता रस्त्यावर डोसे विकताना दिसत आहे.

मल्याळम मनोरंजन क्षेत्रात एकेकाळची गाजलेली अभिनेत्री कविता सध्या रस्त्यावर डोसा विकताना दिसतेय. एका चाहत्याने तिला गाडीवर डोसे करताना पाहिले आणि त्याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. तेव्हापासून हा व्हिडिओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला आहे. यानंतर ‘ओनमनोरमा’ वेबसाईटने कवितावर डोसा विकून पोट भरण्याची वेळ का आली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग १२२ : पुण्यातील ‘पत्र्या मारुती मंदिरा’च्या नावामागची नेमकी गोष्ट काय?
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
this unique way of crossing road was seen for the first time you will not stop laughing after watching video
VIDEO : … तर गाडीची काच फुटलीच म्हणून समजा; रस्ता ओलांडण्याची ‘ही’ पद्धत तुम्ही कधी पाहिली का?

वाचा : करिना आणि मी ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो, केआरके बरळला

ट्रॅव्हल एजन्सीच्या फसव्या आश्वासनांना भुलल्यामुळे कवितावर ही वेळ आल्याचे कळते. याबद्दल ती म्हणाली की, ट्रॅव्हल एजन्सीने माझ्या मुलाला ब्रिटनमध्ये शिक्षण व नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी महिन्याला एक लाख रुपये भरण्यास सांगितले होते. त्यावेळी आम्हाला एक लाख रुपये महिना देणे सहज शक्य होते. त्यामुळे आम्ही वर्षभराची फी ट्रॅव्हल एजंटकडे जमा केली. पण, त्यानंतर आमची फसवणूक झाल्याचे आमच्या लक्षात आले.

या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कलाक्षेत्रातील कोणत्याच व्यक्तीने आपली मदत न केल्याचेही तिने सांगितले. ती म्हणाली की, चित्रपट निर्माता दिनेश पानिकर आणि मनोज हे दोघं वगळता आम्हाला कोणीच मदत केली नाही. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्ही ग्रॅनाइट शोरूम सुरु केले. त्यासाठी आम्ही बँकांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर आमच्यावर शोरूम बंद करण्याची वेळ आली.

वाचा : अमृता खानविलकर ठरली ‘तो’ विक्रम करणारी पहिली मराठी अभिनेत्री!

रस्त्यावर डोसे विकावे लागत असल्याची मला अजिबात लाज वाटत नाहीये. माझी हॉटेलमध्येही काम करण्याची तयारी आहे. मला संधिवात असून हृदयाची व्याधीही आहे. पण त्याची मला चिंता नाही. मला केवळ माझ्या मुलाची काळजी वाटते, असेही कविता यांनी सांगितले.