अभिनेत्री विद्या बालन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘परिणिता’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘डर्टी पिक्चर’, ‘पा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विद्याने भूमिका साकारल्या. विद्याने सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले. कोणतीही अभिनेत्री असो चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्यात काय होतं हे जाणून घेण्याची इच्छा असते. त्यामुळे त्यांना नेहमीच खासगी आयुष्यावर प्रश्न विचारले जातात. असेच काही प्रश्न विद्याला विचारण्यात आले असता विद्याने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

२०१७ मध्ये विद्याच्या वाढत्या वजनामुळे आणि सतत डॉक्टरांकडे जात असल्याचे पाहून ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.  त्याचवेळी एका मुलाखतीत, “लग्न होतं नाही तर लग्न कधी होणार? लग्न झालं की मुलं कधी होणार? असे अनेक प्रश्न एका महिलेला सतत विचारले जातात,” असे म्हणत विद्याने संताप व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

प्रेग्नेंसीवर सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर विद्या म्हणाली, “मी मुलांना जन्म देणारी मशीन नाही. लग्नानंतर वाढलेले वजन आणि डॉक्टरांकडे काही कारणांमुळे सतत जात आहे. याचा अर्थ मी प्रेग्नेंट आहे असा नाही. खरचं आपल्या इथे लग्न झालं की मुलं जन्माला घालण्याबाबत अपेक्षांचं ओझं स्त्रियांवर लादलं जातं, हा निव्वळ वेडेपणा आहे. त्यात कोणी मुलांना जन्म दिला नाही तर काय फरक पडणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

आणखी वाचा : त्या दिवसानंतर अनिल कपूरसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय माधूरीने घेतला होता

विद्या पुढे म्हणाली, “माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्या काकांनी मला सांगितले होते की, पुढच्या वेळी भेटू तेव्हा दोनाचे तीन झाले पाहिजे. काकांच्या अशा बोलण्यावर हसू येतं होतं कारण मी आणि सिद्धार्थने हनीमुनला कुठे जायचं याचा देखील विचार केला नव्हता. माझं लग्न झाल्यापासून जवळचे सगळे नातेवाईक हाच प्रश्न विचारतात. काळ जरी बदलला असला तरी लोकांची मानसिकता काही बदलली नाही.”

 

Story img Loader