बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड जोरात सुरु आहे. येत्या काळात पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, कपिल देव, अभिनव बिंद्रा, हॉकीपटू संदीप या महान खेळाडूंवरील चित्रपट पाहावयास मिळणार आहेत. त्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील चित्रपटाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ आता आणखी एका राजकीय नेत्यावरील चित्रपटाचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

वाचा : सैफची शाहिदला पसंती!

अभिनेत्री विद्या बालन आणि तिचा नवरा तसेच प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांनी इंदिरा गांधी यांच्यावरील पुस्तकाचे अधिकार विकत घेतले आहेत. त्यामुळे लवकरच भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरील चित्रपट प्रेक्षकांना पाहावयास मिळू शकतो. दरम्यान, इंदिरा यांच्या भूमिकेसाठी विद्याचे नाव पुढे येत आहे. मात्र, विद्याने ती ही भूमिका साकारणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

पत्रकार सागरिका घोष यांनी इंदिरा गांधी यांच्यावर लिहिलेल्या ‘इंदिरा : इंडियाज मोस्ट पावरफुल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकाचे अधिकार विद्याने विकत घेतल्याची माहिती ट्विटरवरून देण्यात आली होती. १९७५ साली इंदिरा गांधीनी आणीबाणी घोषित करण्यामागचे कारण, त्यांचे न टिकलेले लग्न, मुलगा संजय आणि त्यांच्या नात्यात असणारा तणाव आणि त्यांच्या काही राजकीय गोष्टी या पुस्तकातून उलगडण्यात आल्या आहेत.

वाचा : रघुराम राजन, सुनिल गावस्कर यांच्या शेजारी रणवीर-दीपिकाचा नवा बंगला?

यापूर्वी, सुप्रिया विनोद यांनी जब्बार पटेल यांच्या ‘यशवंतराव चव्हाण’ (२०१४ ) आणि मधुर भांडारकरच्या ‘इंदू सरकार’मध्ये (२०१७) इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.