20 एप्रिलला अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. यावेळी हिना खान तिच्या कामानिमित्त काश्मीरमध्ये होती. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच हिना मुंबईला येण्यासाठी निघाली. हिना खान मुंबईला पोहताच पैपराजीने तिच्या भोवती गराडा घातला. बिग बॉसचा स्पर्धक असलेल्या विकास गुप्ताला मात्र ही गोष्ट चांगलीच खटकली आणि त्याने फोटोग्राफर्सची कानउघडणी केली.
विकास गुप्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरील असून यात हिना खान तिच्या गाडीकडे जाताना दिसतेय. तिने मास्क आणि गॉगल्स लावले आहेत. हिना खान वाट काढत तिच्या गाडीत बसते. ती तिचा चेहऱा लपवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तर फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी तिचा पाठलाग करताना दिसत आहेत. यावेळी हिना फोटोग्राफर्सना ” प्लिज मला जाऊ द्या” अशी वारंवार विनंती करताना दिसतेय. विकासने हा व्हिडीओ शेअर करत पैपराजींची शाळा घेतली आहे.
Someone has lost their father and is requesting you to let her go to her family but still someone shout face pe light maar and the pap doesn’t stop. @eyehinakhan was still being courteous extremely disappointed with the insensitivity shown here. RIP Uncle https://t.co/w28IEc8me3
— Vikas Gupta (@lostboy54) April 20, 2021
विकास त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे, “कुणीतरी वडिलांना गमावलं आहे आणि तुम्हाला विनंती करत आहे की मला माझ्या कुटुंबाकडे जाऊ द्या. तरीही कुणीतरी चेहऱ्यावर लाईट मार ओरडतंय आणि पैपराजी त्याला अडवतही नाही हिना खानसोबतच्या या असंवेदनशील वागणूकीमुळे अत्यंत निराश आहे. रेस्ट इन पीस अंकल.” असं म्हणत विकासने नाराजी व्यक्त केली आहे.
बिग बॉस फेम अभिनेत्री हिमांशी खुराना हिनेदेखील पैपराजींच्या वागणूकीवर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, ” ज्या व्यक्तीने आपल्य़ा वडिलांना गमावलं आहे तिच्यासोबत मीडियाने संवेदनशीलता दाखवणं गरजेचं आहे. ती प्रेमाने मला जाऊ द्या अशी विनंती करतेय तरी त्यांना कंन्टेट हवाय, लज्जास्पद” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
Very sad to see this.. such an insensitive paps.. Media should show some sensitivity to a person who has just lost her dad.. she is politely asking them to ‘let her go’ but still they want their content. Shameless act.
condolences to the family @eyehinakhan https://t.co/cWvAyqA5Q3— Himanshi khurana (@realhimanshi) April 21, 2021
वाचा: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा ट्रोल, ‘त्या’ युजरला नव्या नंदा म्हणाली…
हिनाचं तिच्या वडिलांसोबत घट्ट नात होतं. हिना बऱ्याच वेळा तिच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ती काही दिवसांपूर्वी आई-वडिलांसोबत मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली होती. तिने तेथील वडिलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.