संपूर्ण देशाचे लक्ष ज्या बातमीकडे लागून राहिले होते ती बातमी म्हणजे ‘विरुष्का’चे लग्न. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीतील टस्कनी गावात ११ डिसेंबरला विवाहबद्ध झाले. दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर लग्नातला फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त विरुष्काच्या लग्नाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. या दोघांचे हे डेस्टिनेशन वेडिंग पाहून अनेकांनाच त्यांचे कौतुक आणि हेवा वाटत आहे. अवघ्या काही तासांमध्ये त्यांचा साखरपुडा, मेहंदी, लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/BckfYKCHXoC/

या व्हायरल व्हिडिओमध्ये आता अनुष्का लग्नमंडपात जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट मंडपात उभा आहे तर अनुष्का मुहुर्तावर तिथे येताना दिसते. या लग्नसोहळ्यात ‘दिन शगना दा चढेया’ हे सुमधुर पंजाबी गाणंही ऐकू येतं. या राजेशाही लग्नात विराट आणि अनुष्काचे जवळचे मित्र-मैत्रीण आणि नातेवाईकच उपस्थित होते. लग्नानंतर विराट आणि अनुष्काने ट्विट करत त्यांनी लग्न केल्याचे स्पष्ट केले.

https://www.instagram.com/p/Bck8L4ng8Dv/

कोहलीने ट्विट करत म्हटले की, ‘आज आम्ही आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात राहण्यातचे वचन दिले. ही गोष्ट चाहते, मित्र- परिवारासोबत शेअर करताना अत्यानंद होत आहे. तुमच्या सदिच्छा अशाच आमच्या पाठिशी राहो. आमच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग झाल्याबद्दल धन्यवाद.’

https://www.instagram.com/p/BckS2L1gKIx/

https://www.instagram.com/p/Bckc2GUhXQy/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.