क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गजांनी रविवारी एका चॅरिटी फुटबॉलमध्ये नेहमीप्रमाणेच रंगत आणली. हा सेलिब्रिटी सामना शहाजीराजे भोसले स्टेडिअमवर खेळवण्यात आला होता. एकीकडे होती विराट कोहलीची टीम तर दुसरीकडे रणबीर कपूरची. हा सामना रंजक होईल असे वाटत असताना नंतर नंतर मात्र, हा सामना एकतर्फीच झाला, असे म्हणावे लागेल. विराटच्या टीमने रणबीरच्या टीमचा ७-३ असा पराभव केला.

‘ऑल हार्ट टीम’ अर्थात विराटच्या टीमकडून सर्वात जास्त गोल धोनी आणि अनिरुद्ध श्रीकांत यांनी केले. तर विराट आणि केदार जाधव यांनीही प्रत्येकी १-१ गोल केला. क्रिकेटमधला बादशहा समजल्या जाणाऱ्या धोनीने फुटबॉलच्या मैदानावरही आपल्या नावाचा दबदबा कायम राखला. त्याने पहिला गोल सातव्या मिनिटाला केला.

https://www.instagram.com/p/BaR4KzhA1O3/

विराटच्या संघाने सुरूवातीलाच आघाडी घेतल्यानंतर धोनीने ३९ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. धोनीचा हा गोल पाहून तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले. हे गोल करताना धोनीने कोणत्याही व्यावसायिक फुटबॉलपटूप्रमाणेच कौशल्य दाखवले. हा सामना अभिषेक बच्चन आणि विराट कोहली यांच्या धर्मदाय संस्थेसाठी होती.

क्रिकेटमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी धोनी फुटबॉल खेळायचा. तो त्याच्या टीमचा गोलकिपर होता. त्याला स्वतःला फुटबॉलमध्ये करिअर करण्याची इच्छा होती.