काही तासांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लग्न करणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी भारतभर पसरली. येत्या ९ ते १२ डिसेंबर दरम्यान हे प्रेमी युगूल विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. एवढेच काय तर इटलीमध्ये ते हिंदू पद्धतीने लग्न करत असल्याचीही वार्ता येत होती. या बातमीमुळे विराट आणि अनुष्काचे चाहते खूश होतात न होतात तोच त्यांच्या लग्नाची बातमी खोटी असल्याचे वृत्त समोर आले आहे.

अनुष्काच्या प्रवक्त्याने विराट आणि अनुष्का इटलीमध्ये लग्न करत नसल्याचे म्हटले. अनेक वृत्त वाहिन्यांवर या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आल्यामुळेच त्यांना हे विधान देणे गरजेचे पडले.

https://www.instagram.com/p/BcBtAkVBBbq/

विराट आणि अनुष्का यांच्या परिवाराची इटलीची तिकीटं आधीच बूक झाली आहेत. जवळच्या मित्र-परिवारांच्या उपस्थितीत इटलीमध्ये ९, १०, ११ आणि १२ तारखेला हिंदू पद्धतीने हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत. तीन ते चार दिवसांचा हा लग्न सोहळा कोणत्याही ग्रॅण्ड इव्हेंटपेक्षा कमी नसेल, अशाच चर्चा सर्वत्र होत्या. गेल्या चार वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. एका जाहिरातीनिमित्त या दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीत व्हायला वेळ लागला नाही.

https://www.instagram.com/p/BcB7K5dHhBC/

दरम्यान, विराट आणि अनुष्काने काही दिवसांपूर्वी कपड्याच्या ब्रँडसाठी जाहिरात केली होती. या दोघांचं नातं आणि लग्नाची थीम अशी संकल्पना या जाहिरातीची होती. लग्नावेळी पती-पत्नी एकमेकांना अनेक वचन देतात. याच थीमवर आधारित विराट आणि अनुष्कानं मॉर्डन वचनं एकमेकांना दिली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.