विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न म्हणजे देशातील सर्वात जास्त चर्चेचा विषय झाला आहे. लग्नाच्या दोन दिवसांनंतरही त्यांच्या लग्नाबद्दलच्या चर्चा कमी झालेल्या नाहीत. पुढील काही दिवस तरी ‘विरुष्का’चं लाइमलाइटमध्ये राहतील असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
विरुष्काचं लग्न जेवढं राजेशाही पद्धतीने झालं तेवढाच खास तिचा साखरपुडाही होता. विराटने फार प्रेमाने तिला अंगठी घातली.
https://www.instagram.com/p/BcmCfw1nmRK/
साखरपुड्याच्या दिवशी विराट फार भावूक झाला होता. त्यामुळेच एकमेकांना अंगठी घातल्यानंतर त्याने अनुष्काला मिठी मारली.
अंगठी निवडायला लावले तीन महिने
बॉलिवूड लाइफने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, विराटने अनुष्काला घातलेली अंगठी फारच खास आहे. खड्याच्या या अंगठीची किंमत १ कोटींहून जास्त आहे. या अंगठीची खासियत म्हणजे ऑस्ट्रियाच्या एका प्रसिद्ध डिझायनरने ही अंगठी डिझाइन केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक बाजूने या अंगठीचे रूप नजरेस वेगळे भासते.
https://www.instagram.com/p/BcmXr00n5oM/
विरुष्काने इटलीतील बोर्गो फिनोशिएतो हॉटेलमध्ये लग्न केले. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, जगभरात लग्नासाठी प्रसिद्ध असलेल्या टॉप २० हॉटेलमध्ये या हॉटेलचा समावेश आहे.