विनोदवीर कपिल शर्माचा लोकप्रिय ठरलेला ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २१ ऑगस्टपासून हा शो छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. आधीचे कपिलचे ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ चांगलेच हिट ठरले होते.  देशभरातील प्रेक्षकांसोबच अनेक सेलिब्रिटी या शोचे आणि कपिल शर्माचे चाहते आहेत. यापैकीच एक म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली.

विराट कोहली कपिल शर्माचा एवढा मोठा चाहता हे की एकदा विराटला कपिल शर्माचा शो पाहण्यासाठी ३ लाख रुपये मोजावे लागले होते. कपिल शर्माच्या ‘कॉमिडी नाइट्स विथ कपिल’ या शोमध्येच विराटने या गोष्टीचा खुलासा केला होता.

हे देखील वाचा: हद्द झाली: फायनलला पोचला रवी कुमार; चाहते आभार मानतायत सलमान, आमीर खानचे

सामना सपंल्यानंतर अनेकदा आपण कपिल शर्मा शो पाहत असल्याचं विराट यावेळी म्हणाला. तसचं विराटने श्रीलंका दौऱ्याचा एक किस्सा शेअर केला. विराट विमानतळावर बसला होता. यावेळी खूप कंटाळा आल्याने विराटने त्याच्या मोबाईलमध्ये भारताचं 3G सेल्युलर नेटवर्क सुरु केलं आणि तो कपिल शर्मा शो पाहू लागला. यावेळी जवळपास एक तास विराटने इंटरनॅशनल रोमिंगमध्ये में ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ पाहिल्याचं त्याने सांगितलं. एवढ्यात विराटला त्याच्या भावाचा फोन आला त्याने विचारलं, “तू काय करतोय.” यावर विराट म्हणाला, “आम्ही सर्व विमानतळावर आमच्या सामानासाठी थांबलो आहेत. तोपर्यंत मी ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ शो पाहतोय.” विराटच्या या उत्तरानंतर त्याच्या भावाने असं काही सांगितंलं की जे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. विराटच्या भावाने मोबाईलचं बील ३ लाख रुपये आल्याचं त्याला सांगितलं. विराट कोहलीने हा संपूर्ण किस्सा कपिल शर्मासोबत शेअर केला होता.

दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार गेस्ट म्हणून हजेरी लावणार आहे.