अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला त्यांचे चाहते उत्सुक असतात. चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्सने एक असा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे जो पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. विराटचं अनुष्कावरचं प्रेम त्याने या व्हिडिओमध्ये दाखवून दिले आहे. तसे ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा विराटने त्याचे प्रेम सर्वांसमोर व्यक्त केले. त्याला जिथे संधी मिळेल तिथे तो अनुष्काबद्दल भरभरून बोलत असतो. पण अनुष्का मात्र सार्वजनिक ठिकाणी विराटचा विषय काढणं जरा टाळतेच. तिने विराटसोबतच्या नातेसंबंधांबद्दल कोणतेही व्यक्तव्य केले नसले तरी तिने कधी विराटच्या नात्याबद्दल नकारही दिला नाही. सध्या ते अनेक पार्टी आणि लग्न सोहळ्यांमध्ये एकत्र जाताना दिसतात.
प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित
नुकताच स्टार स्पोर्ट्सने घेतलेल्या मुलाखतीत विराटने पुन्हा एकदा अनुष्काची भरभरून प्रशंसा केली आहे. त्याच्या करिअरच्या मुख्य काळात अनुष्का कशी त्याच्यासोबत होती या आठवणींना त्याने उजाळा दिला. ‘जेव्हा मला मेलबर्नमध्ये पहिल्यांदा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते तेव्हाही अनुष्का माझ्यासोबत होती. तो एक खास क्षण होता जो आम्ही दोघांनी एकत्र शेअर केला.’
याशिवाय, मोहाली सामन्यावेळी जेव्हा मी कर्णधार होणार हे सांगण्यात आले होते तेव्हाही अनुष्का माझ्यासोबतच होती. त्यावेळी १० मिनिटांसाठी मला माझ्या अकॅडमीपासून सुरू केलेला प्रवास आठवला. तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते. कारण मी कधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनेन असा कधीच विचार केला नव्हता. पण तो क्षण अविस्मरणीय होण्याचं अजून एक कारण म्हणजे त्यावेळीही अनुष्का माझ्यासोबत होती. या काही अशा गोष्टी आहेत ज्या मी कधीही विसरणार नाही.’
VIDEO: श्रीदेवी, शिल्पाने मिळून उडवली करणची खिल्ली
विरुष्काने काही दिवसांपूर्वी झहिर खान आणि सागरिका घाडगे यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. त्यामुळे आता झहिर पाठोपाठ विराटही साखरपुडा करणार का असा प्रश्न अनेकांना मनात आहे. अनुष्काच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर तिचा शाहरुख खानसोबतचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. इम्तियाज अली याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.