गेल्या आठवड्यापासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. कोहली आणि शर्मा कुटुंबीय ८ तारखेलाच इटलीसाठी रवाना झालेले. इटलीत लग्न कुठे होणार, कोणकोणत्या सेलिब्रिटींना आमंत्रित केलं गेलं, मुंबईत रिसेप्शन होणार का, अशा एक ना अनेक गोष्टींची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र, लग्नाबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आली नव्हती. अखेर काल संध्याकाळी विराट आणि अनुष्काने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ते विवाहबंधनात अडकल्याचे जाहीर केले. इटलीतील टस्कनी येथे हा विवाहसोहळा पार पडला.
PHOTOS : अनुष्का-विराटचा ‘वेडिंग लूक’ ट्रेंडमध्ये
विराट-अनुष्काच्या लग्नानंतर त्यांच्या प्रवक्त्याने विरुष्काच्या लग्नाची अधिकृत माहिती दिली. तसेच, त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाविषयीदेखील सांगितले. ‘हे नवदाम्पत्य आता द.आफ्रिकेला रवाना होणार आहेत. येथे विराट त्याच्या आगामी सामन्यांची तयारी करेल. तर अनुष्का त्यावेळी त्याच्यासोबत नववर्षाचा आनंद साजरा करेल. यानंतर हे दोघं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतल्यानंतर अनुष्का आनंद एल रायच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुरुवात करेल. त्याचसोबत ती ‘सुई-धागा’ चित्रपटासाठीही तयारी करेल. वरुण आणि अनुष्का फेब्रुवारीमध्ये चित्रीकरणाला सुरुवात करतील. अनुष्काचा ‘परी’ चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असल्याने त्याचे प्रसिद्धी कार्यक्रमही त्याचदरम्यान सुरु असतील.’
वाचा : ‘विरुष्का’ला पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींकडून लग्नाच्या शुभेच्छा
येत्या २१ डिसेंबरला नवी दिल्लीमध्ये विरुष्काच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित राहतील. यानंतर बॉलिवूड, क्रिकेट आणि कॉर्पोरेट जगतातील सेलिब्रिटींसाठी २६ डिसेंबरला पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, विराट-अनुष्काच्या साखरपुड्याचा आणि लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#VirushkaWEDDING Haldi ceremony happening I think @imVkohli looking so happy pic.twitter.com/ixl8GewoNs
— kusum Bhutani (@kusumbhutani) December 11, 2017
#VirushkaWEDDING: The super fun varmala ceremony of @imVkohli and @AnushkaSharma… God bless the happy couple! pic.twitter.com/EsEMmryTC6
— BombayTimes (@bombaytimes) December 11, 2017
OMFG They kissed and hugged each other. And “PERFECT” song is playing in the background!!#VirushkaWEDDING pic.twitter.com/ELJybbFdxQ
— ∞ (@JustLykYouu) December 11, 2017