बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनी त्यांच्या हटके सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. ओमकारा, मक़बूल मकड़ी या सिनेमांसोबतच हैदर आणि कमिने सारख्या गाजलेल्या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलंय. यानंतर आता विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालाय. आसमानने देखील दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. आसमानेन त्याच्या पिहल्या सिनेमाची घोषणा केलीय.
आसमान भारद्वाज दिग्दर्शित ‘कुत्ते’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून या सिनेमाचं हटके मोशन पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलंय. या सिनेमात अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाच्या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.
‘कुत्ते’ सिनेमाचा फर्स्ट लूक पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा दिसत नाहीय. त्यांच्या चेहऱ्यांच्या जागी विविध प्रजातींच्या श्वानांचे चेहरे लावण्यात आले आहेत.
View this post on Instagram
हे देखील वाचा: बिकिनीमधील देवोलीनाचा बेली डान्स व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले “गोपी बहू घोर अनर्थ”
आसमान भारद्वाजसह सिनेमातील अनेक कलाकारांनी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय. “ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं… बस काटते हैं” ही टॅगलाइन देत सिनेमाचं पोस्टर शेअर करण्यात आलंय. वडील विशाल भारद्वाज यांच्यासोबत आसमानने या सिनेमाची कथा लिहिली आहे. हा एक थ्रीलर सिनेमा असेल. यावर्षाच्या शेवटी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
आसमानने न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केलंय. त्याने वडील विशाल भारद्वाज यांना ‘मटरू की बिजली का मनडोला’ आणि ‘पटाखा’ अशा काही सिनेमांमध्ये असिस्ट केलंय.