सध्या कंगना आणि तिचा ‘सिमरन’ सिनेमा फार चर्चेत आहेत. कंगनाचा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या टप्प्यात काळात काही ना काही कॉन्ट्रोव्हर्सी झालेली पाहायला मिळते. सध्या कंगना आणि तिचे प्रेमसंबंध याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी कंगना आणि हृतिक यांच्या नात्याच्या वादात हृतिकची बाजू घेतली. प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनीही आता यात उडी घेतली आहे.

Happy birthday Ramya Krishnan: जाणून घ्या रम्याच्या प्रॉपर्टी आणि मानधनाबद्दल

एका पुस्तक अनावरण सोहळ्यात ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना विशाल म्हणाले की, हतिक आणि कंगनाच्या नात्याबद्दल वृत्तपत्रात दररोज काही ना काही छापून येत होते. तेव्हा ती आमच्यासोबत ‘रंगून’ सिनेमाचे चित्रीकरण करत होती. तिच्यासाठी तो फार कठीण काळ होता. पण तरीही ती दररोज सेटवर यायची आणि आपले काम प्रामाणिकपणे करायची. तिच्या खासगी आयुष्यात चाललेल्या कोलाहलाची झळ तिने चित्रीकरणाला लागू दिली नाही. तिने एकही दिवस सिनेमाचे चित्रीकरण रद्द करण्यास सांगितले नाही.

‘कंगना खूप प्रोफेशनल आहे. रंगून सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान तिच्या मनात चाललेल्या वादळाची समोरच्याला कल्पनाही येऊ दिली नाही. तिच्या जागी दुसरीकोणी असती तर कदाचित आम्हाला सिनेमाचे चित्रीकरण बंद करावे लागले असते.’

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होता ‘रंगून’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. या सिनेमाकडून कंगनाला फार अपेक्षा होत्या. फक्त कंगनाच नव्हे तर विशाल भारद्वाज यांचेही हे ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले जात होते. उत्तम कलाकार आणि दिग्दर्शक असूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान शाहिद आणि कंगनामध्ये काही वाद झाले होते. त्यानंतर विशाल आणि कंगना यांच्यातही वाद झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता ज्या पद्धतीने विशाल हे कंगनाची बाजू घेताना दिसले त्यावरुन तरी त्यांच्यात काहीच वाद नसल्याचे स्पष्ट होते.