गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या दुनियेपासून फारकत घेतलेला अभिनेता विवेक ओबेरॉय एका बायोपिकच्या माध्यमातून पुनरागमन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या बायोपिकमध्ये तरुणपणीच्या मोदींची भूमिका विवेक साकारणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या.

पहिल्यांदाच अभिनेत्यापेक्षा ज्या व्यक्तीवर बायोपिक आहे तोच उत्तम अभिनेता आहे, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया एका युजरने दिली.

तर काहींनी मोदींच्या परदेश दौऱ्यावरूनही गमतीशीर टिप्पणी केली.

विवेक आणि सलमानचा वाद सर्वांनाच ठाऊक आहे. बायोपिकमध्ये सलमानच्या कॅमिओची मागणी एका युजरने केली.

 

‘विवेकचे अच्छे दिन आले..’

वाचा : ‘संग्राम भालेराव’ची धडाकेबाज कामगिरी; ‘सिम्बा’ने जमवला २०० कोटींहून अधिकचा गल्ला 

या बायोपिकचं दिग्दर्शन उमंग कुमार करणार आहे. यापूर्वी उमंग यांनी मेरी कोमच्या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे पेलली होती. चित्रपटात तरुणपणीच्या मोदींची भूमिका विवेक साकारत असताना परेश रावल नंतरच्या काळातील मोदींची भूमिका साकारताना दिसणार आहेत. याच महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.