बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर बेधडकपणे ते त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतीच विवेक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत विवेक यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर निशाणा साधला आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

विवेक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ‘बॉलीवूडची कहाणी, बॉलिवूड कशा प्रकारे काम करते हे समजण्यासाठी आता मी खूप वेळ घालवला आहे. तुम्ही जे पाहता ते बॉलिवूड नाही. खरं बॉलिवूड तर तुम्हाला तुमच्या सहकलाकारांमध्ये दिसेल. बॉलिवूडची आतली बाजु इतकी काळी आहे की ते सामान्य माणसाला समजून घेण कठीण आहे,’ असे विवेक त्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, ‘या काळोखात स्वप्न ही अपूर्ण राहतात, तर कधी कोणाच्या भीतीमुळे तशीच राहतात. बॉलिवूड जर गुणांची खाण आहे तर दुसरीकडे याच गुणांना येथे लाथाडलं देखील जातं. इथे फक्त नकार दिला जात नाही तर, या चित्रपटसृष्टीत येणाऱ्या प्रत्येकाला माहित असतं की नकार हा यासृष्टीतील एक प्रकार आहे.’

आणखी वाचा : डोळे बंद करुनही सिद्धार्थला ओळखायची शेहनाज, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल रडू

पुढे या विषयी सांगताना विवेक म्हणाले, ‘हा अपमान आणि शोषण आहे जे कोणत्याही प्रकारची स्वप्न, आशा आणि आपल्यावर असलेला विश्वास चिरडून टाकतो. एखादी व्यक्ती अन्नाशिवाय जगू शकते. मात्र आदर आणि आशेशिवाय जगणे अशक्य आहे. कोणताही मध्यमवर्गीय तरुण या परिस्थितीत असल्याची कल्पना करत मोठा झाला नाही किंवा होत नाही.’

आणखी वाचा : अधिकाऱ्यावर कारवाईचे कारण KBC नाही तर, रेल्वेने दिली भलीमोठी यादी

सगळ्यात शेवटी काय होते हे त्यांनी सांगितले आहे. ‘तुम्ही तुमच्या स्वप्नांना शांतपणे पुरुन टाकतात. त्यानंतर इतर लोक तुमच्या स्वप्नाच्या कबरीवर नाचताना दिसतात. तुम्ही अपयशी झालात हे पाहून ते आनंदी होतात. जिवंत असूनही तुम्ही एका मृत माणसासारखे असतात. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात हे फक्त तुम्हाला माहित असते. एक दिवस तुमचे निधन होते आणि मग संपूर्ण जर तुम्हाला पाहतं.’

Story img Loader