वय हा केवळ एक आकडा असतो हे ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी सिद्ध केलं आहे. सध्या सोशल मीडियावर वहीदा यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्या सुट्ट्यांचा आनंद घेत असून समुद्रातील अॅडवेंचरची मजा घेत असल्याचे दिसत आहे. ८३ वर्षांच्या वहीदा यांनी समुद्रात स्नोर्कलिंग (Snorkeling) करत चाहत्यांची मने जिंकली आहेत.

वहीदा या सध्या मुलगी काश्वी रेखीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अंदमानला गेल्या आहेत. काश्वीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तेथील काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये वहीदा यांनी मुलीलोबत स्नोर्कलिंग करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा पाण्याच्या आतील फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
100 Ghungaru Nagin Chappal Price Will Shock You Watch Video
७ नागाचे फणे, सहा किलो वजन, पंढरपूरच्या दानवेंची ‘नागीण चप्पल’ दिसते कशी? किंमत ऐकून थक्कच व्हाल

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashvi (@kashvi_rekhy)

आणखी वाचा: मुस्लिम असल्यामुळे भरतनाट्यम शिकवण्यास गुरुजींनी दिला होता नकार, वहीदा रहमान यांचा खुलासा

काश्वीने आई वहीदा यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ‘आईसोबत स्नोर्कलिंग #waterbabies’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी वहीदा यांची प्रशंसा केली आहे. एका यूजरने ‘मला हे पाहून प्रचंड आनंद झाली की वहीदा या त्यांची बकेट लिस्ट पूर्ण करीत आहेत. वय हा केवळ एक आकडा आहे’ असे कमेंट करत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘वहीदा यांना पाहून प्रेरणा मिळते’ असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी वहीदा यांनी छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम ‘डांस दीवाने ३’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केले.