एकेकाळी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आयशा टाकिया गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दुरावली आहे. लग्न केल्यानंतर आयशा तिच्या मुलामध्ये आणि संसारात रमली. काही दिवसापूर्वीच ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली. तिने सर्जरी केल्याचे वृत्त सगळीकडे फिरत होते. या वृत्ताला तिने आपल्या भाषेत उत्तरही दिलं. दरम्यान, आता आयशा पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुनर्पदार्पण करण्यास सज्ज झाली असून तिने केलेल्या नव्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

वाचा : चाहत्यांचे प्रेम या अभिनेत्रींना पडले महागात

आयशा लवकरच ‘बोरिवली का ब्रुस ली’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याविषयी ‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. यावेळी तिने बॉलिवूडविषयी अनेक खुलासे केले, ज्यामध्ये तिने चित्रपटांमधील बिकिनी दृश्यांवरही भाष्य केलं. चित्रपटात बिकिनी घालण्यास नकार दिला तर निर्माते अभिनेत्रीची चित्रपटातून हकालपट्टी करतात, यावरून बऱ्याचदा चर्चा रंगल्याचे दिसते असा प्रश्न आयशाला करण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, मी जवळपास २० चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यापैकी एकाही चित्रपटात बिकिनी घातली नाही. त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. मला माझ्या मर्यादा माहित असल्याने त्यासाठी मी सरळ नकार दिला. मला फॅशनेबल आणि ग्लॅमरस राहायला आवडतं. इतरांप्रमाणे मलाही फॅशनची आवड असली तरी त्यावर काही मर्यादा आहेत. काही गोष्टींमध्ये मला अवघडल्यासारखं होतं आणि त्या मी करत नाही.

वाचा : VIDEO ऐश्वर्या मराठीत बोलते तेव्हा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिकिनी सीन्सला नकार देण्यामागचा आपला विचार मांडताना आयशा म्हणाली की, मला अजूनही आठवतं लग्नापूर्वी चित्रपट करताना माझ्या मनात एकच विचार असायचा की, पुढे जाऊन माझी मुलं होतील. ते मला अशा सीनमध्ये पाहतील तेव्हा त्यांना किती अवघडल्यासारखं वाटेल. माझा तो विचार किती बरोबर होता हे मला कळतंय. आता मला एक मुलगा असून मला पूर्ण विश्वास आहे की माझा कोणताही चित्रपट तो केव्हाही पाहू शकतो.