लवकरच सलमान खान आणि कतरिना कैफ हे ‘टायगर जिंदा है’ या सिनेमातून एकत्र येणार आहेत ही बातमी एव्हाना साऱ्यांनाच माहिती आहे. ही जोडी अनेक देशांमध्ये सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. नुकतेच या टीमने त्यांचे ५० दिवसांचे अबु धाबी येथील ठरलेले शेड्युल पूर्ण केले. कामासोबतच जर थोडासा विरंगुळा असेल तर ते काम, काम वाटत नाही असं म्हणतात. ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या सेटवरही काहीसे असेच वातावरण होते. दिवसभर काम केल्यानंतर टायगरची टीम रात्री थोडा विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळायची.

अभिषेकसोबत लग्न केल्याचा दावा करणारी ‘ती’ येणार ‘बिग बॉस ११’ मध्ये?

नुकताच एक गल्ली क्रिकेट खेळताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे मुख्य कारण होती ती कतरिना कैफ. या खेळात स्वतः कतरिनाही सहभागी झाली होती. या व्हिडिओमध्ये ती बॉलिंग करताना दिसतेय. कतरिनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. कतरिनासोबत यावेळी अंगद बेदीही बॉलिंग करत होता. कतरिनाने या व्हिडिओला ‘काही दुर्दैवी गोलंदाज’ असे कॅप्शन दिले आहे.

सध्या कतरिना क्रिकेट शिकण्याकडे फार लक्ष देत आहे. टीमशी निगडीत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘कतरिनाला क्रिकेट खेळणं फार आवडतं आणि ती सतत या खेळातले बारकावेदेखील शिकत असते. अंगद स्वतः क्रिकेटर आहे. सिनेमाचे दिवसाचे चित्रीकरण संपल्यानंतर अंगद आणि ती अनेकदा क्रिकेट खेळताना दिसतात. त्या दोघांसाठी जणू ही एक प्रथाच झाली आहे. दररोज चित्रीकरण संपल्यानंतर क्रिकेट कुठे खेळायचं याचं नियोजन करताना ते दिसतात. तिच्यात क्रिकेट खेळताना झालेले बदल आता स्पष्ट जाणवू लागले आहेत. ती या खेळात आधीपेक्षा अधिक परिपक्व झाली आहे. स्वतः अंगद हा माजी क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा असल्यामुळे क्रिकेट हे त्याच्या नसानसात आहे यात काही वाद नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टायगर जिंदा है’ या सिनेमातून सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. ‘एक था टायगर’ या त्यांच्या गाजलेल्या सिनेमाचा हा सिक्वल आहे. अंगद बेदीचीही या सिनेमात फार महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे ‘एक था टायगर’ हा सिनेमा संपवण्यात आला होता तिथून ‘टायगर जिंदा है’चे कथानक पुढे सरकणार आहे. अली अब्बास झफर दिग्दर्शित हा सिनेमा या वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.