तब्बल सतरा वर्षांनंतर जगभरातील १०८ सौंदर्यवतींना मागे टाकत हरयाणाच्या मानुषी छिल्लर या २१ वर्षीय युवतीने ‘मिस वर्ल्ड २०१७’ हा किताब पटकावला. चीनमधील सान्या शहर एरिनामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम पाचमध्ये भारतासोबत इंग्लंड, फ्रान्स, केनिया आणि मेक्सिको या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावले होते. परंतू, या सगळ्यांना मागे टाकत मानुषीने ‘मिस वर्ल्ड’ किताबासाठीचा भारताचा सतरा वर्षांचा वनवास संपुष्टात आणला. वाचा : बलात्कारप्रकरणी प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याला अटक मानुषीच्या जिंकण्यामध्ये केवळ तिच्या बाह्य सौंदर्याचा हातभार नसून, तिने अंतिम फेरीत दिलेल्या उत्तराचेही योगदान तितकेच महत्त्वाचे ठरले. त्याचसोबत तिच्या या यशात अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही वाटा आहे. झालात ना तुम्हीही आश्चर्यचकित? तसं बघायला गेलं तर मानुषीच्या यशात दीपिकाचा थेट हात नाही. पण दीपिकाच्या एका प्रसिद्ध गाण्याची मानुषीला बरीच मदत झाली. 'टॅलेण्ट राऊंड'मध्ये मानुषीने दीपिकाच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' चित्रपटातील 'नगाडा संग ढोल' या गाण्यावर नृत्य केले होते. त्यामुळेत दीपिकाचाही मानुषीच्या यशात अप्रत्यक्ष वाटा असल्याचे जात आहे. 'नगाडा संग ढोल' या गाण्यावर मानुषी नृत्य करत असल्याचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे. वाचा : दहाव्या बॉयफ्रेंडसोबतही सुश्मिताचे फिस्कटले? या राऊंडसाठी मराठमोळा नृत्य दिग्दर्शक नकुल घाणेकरने मानुषीची तयारी करून घेतली होती. ‘मेरे ढोलना’ या गाण्यावर मानुषीने एक भरतनाट्यम-कुचीपुडी मिक्स असा परफॉर्मन्स केला होता. तर लोककला सादर करण्यासाठी तिने ‘नगाडा संग ढोल बाजे’ या गाण्यावर राजस्थानी लोकनृत्य केले होते.