व्हेल माश्यासोबत स्विमिंग असो, विविध स्टंट असो किंवा सेटवर क्रिकेट खेळणं, अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करते. सलमान आणि कतरिनाचा ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली असतानाच सेटवरील नवनवीन फोटो सोशल मीडियावर नेहमीच पाहायला मिळतात. नुकतंच या टीमने त्यांचं ५० दिवसांचं अबुधाबी येथील ठरलेलं शेड्युल पूर्ण केलं. शूटच्या शेवटच्या दिवशी कतरिना आणि अंगद बेदी यांनी मिळून रायफल शूटिंगचा अनुभव घेतला.

आतापर्यंत सेटवरील बऱ्याच घडामोडी कतरिना तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत राहिली. पण यावेळी कतरिनाने नाही तर अंगदने रायफल शूटिंग करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ”टायगर जिंदा है’च्या शूटिंगचा शेवटचा दिवस. हा माझा सर्वांत आवडता आणि विस्मरणीय क्षण आहे. तुमच्या बाजूला अचूक निशाणा साधणारी कतरिना कैफ असेल तर तुम्हाला तुमचा खेळ बंद करावा लागेल,’ असं कॅप्शन अंगदने या व्हिडिओला दिलंय. अंगदने असं कॅप्शन का दिलंय हे तुम्हाला व्हिडिओ पाहून लक्षात येईलच.

वाचा : राणी पद्मावतीला मल्लिका म्हटल्याने ट्रोल झाला रणवीर 

यापूर्वी अंगद आणि कतरिनाचा सेटवर क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दिवसभर काम केल्यानंतर टायगरची टीम रात्री थोडा विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळायची. दररोज चित्रीकरण संपल्यानंतर क्रिकेट कुठे खेळायचं याचं नियोजन करताना ते दिसतात. कतरिनाला क्रिकेट खेळणं फार आवडतं आणि ती सतत या खेळातले बारकावेदेखील शिकत असते, अशी माहिती टीमशी निगडीत सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान खान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा हा सिक्वल असून अली अब्बास जफर याचं दिग्दर्शक करत आहेत.