यंदाच्या ख्रिसमसला दिग्दर्शक अली अब्बास जफर हा सलमान खानच्या चाहत्यांसाठी अॅक्शनपॅक ‘टायगर जिंदा है’ चित्रपट घेऊन येतोय. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी अली आणि अभिनेत्री कतरिना कैफने चित्रीकरणाच्या प्रवासात आपल्या चाहत्यांनाही सामील करून घेतल्याचे दिसते. चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासूनच सेटवरील व्हिडिओ आणि फोटो हे दोघंही सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यावेळी कतरिनाने दिग्दर्शकासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यांच्यामधील मजेशीर संवाद यात पाहावयास मिळतो.

वाचा : चित्रपटसृष्टीसोडून अभिनेत्रीचा राजकारणात प्रवेश

व्हिडिओमध्ये कतरिनाच्या कामाने प्रभावित होऊन आदित्य चोप्राने तिला नवीन गाडी भेट स्वरुपात दिल्याचे अली सांगतो. मात्र, कॅमेरा फिरताच ती गाडी नसून, चॉपर असल्याचे दिसते. तसेच, लवकरच ‘टायगर जिंदा है’चे चित्रीकरण पूर्ण होत असल्याचेही दोघांनी सांगितले. चित्रीकरण पूर्ण होण्यास आता काही दिवसच राहिलेत, अशावेळी तुझ्या काय भावना आहेत?, असा प्रश्न कतरिनाने अलीला विचारताच तो म्हणाला की, ‘हा संपूर्ण प्रवास खूप खास होता. यंदाच्या ख्रिसमसला या चित्रपटाच्या रुपाने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू असेल, अशा अपेक्षा करूया.’ त्यानंतर कतरिनाचे डोळे पाणावल्याचे पाहताच अलीने व्हिडिओ बंद केला.

वाचा : जाणून घ्या रम्याच्या प्रॉपर्टी आणि मानधनाबद्दल

अली अब्बास जफरने आणखी एक व्हिडिओ शेअर करत अबू धाबी सरकारने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले.

सलमान खाननेही गुरुवारी चित्रिकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर ट्विट करून चाहत्यांना त्याबद्दल माहिती दिली होती.