बॉलिवूडमध्ये कपूर हे आडनावच पुरेस आहे. कपूर खानदान नेहमीच ‘हम साथ साथ है’ मधील कुटुंबाप्रमाणे आपल्याला एकत्र दिसतात. कोणाचाही वाढदिवस असो वा अॅनिव्हर्सरी संपूर्ण कपूर खानदान अगदी रणबीर कपूर, करिना कपूर खानदेखील Kareena Kapoor प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. रणबीर सध्या कतरिना कैफसोबत त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची प्रसिद्धी करत आहे. त्यादरम्यान, त्याला करिनाचा चिमुकला तैमुर अली खान पतौडीबद्दल Taimur Ali Khan विचारण्यात आले. करिना आणि सैफ या आपल्या प्रसिद्ध आई-वडिलांप्रमाणेच पाच महिन्यांच्या तैमुरनेही माध्यमांचे लक्ष वेधले आहे. करिनानेही तिचा मुलगा सगळ्यात सुंदर मुलं असल्याचे म्हटले होते आणि ते खरं असल्याचं सोशल मीडियावरील त्याचे फोटो पाहून कळतं.

वाचा : एक्स गर्लफ्रेंडने रोहित शर्माला ट्विटरवर केले ब्लॉक

एका रेडिओ स्टेशनवर बोलत असताना रणबीरनेही Ranbir Kapoor या गोष्टीला दुजोरा दिला. ‘तैमुर तीन महिन्यांचा असताना मी त्याला पाहिले होते. त्यानंतर आता मी जेव्हा इंटेरनेटवर त्याचे नवीन फोटो बघितले तेव्हा माझ्या चेहऱ्यावर ‘सुंदर…. कोण आहे हा?’ असे भाव होते. सैफ आणि करिनाची झलक त्याच्यात पूर्णपणे दिसून येते. तो चित्रपटसृष्टीत कधी पदार्पण करतोय याकडेच आम्हा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे,’ असे रणबीरने म्हटले. रणबीरने भलेही विनोदाने तैमुरच्या पदार्पणाबद्दल वक्तव्य केले असले तरी या चिमुकल्या स्टारला नक्कीच सर्वांना रुपेरी पडद्यावर पाहायला आवडेल.

वाचा : स्वतःवरचेच व्हायरल जोक्स जेव्हा रिंकू वाचते…

लहान मुलांबद्दल बोलतच आहोत तर रणबीरचा आगामी चित्रपटही खास लहानग्यांसाठीच आहे. ‘जग्गा जासूस’ चित्रपटाने रणबीर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘मी आणि दादा (अनुराग बासू) जवळपास तीन वर्षांपूर्वी चर्चा करत होतो तेव्हा लहान मुलांसाठी भारतात असा सध्यातरी कोणताही खास चित्रपट नसल्याचे आढळून आलं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद घेता येईल असा चित्रपट आम्ही आणायचं ठरवलं. वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित अशी ही एक गोष्ट आहे, असे रणबीर म्हणाला.