अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांची वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ने सध्या धुमाकूळ घातला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, जितेंद्र जोशी आणि राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. एकीकडे आक्षेपार्ह संवाद आणि दृश्यांमुळे चर्चेत आलेली ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्याच्या दुसऱ्या सिझनची जोरदार मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे. #WeWantSacredGames2 हा हॅशटॅग ट्रेण्ड होत असून या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरात लवकर यावा अशी मागणी नेटकरी करत आहेत.

या वेब सीरिजमध्ये देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान करणारे संवाद असल्याचे म्हणत त्याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होता. त्यावर सुनावणीदरम्यान कोर्टाने पुढील भाग प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मागणीखातर ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सिझन प्रदर्शित होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/bong_diva/status/1022449307968884738

https://twitter.com/bong_diva/status/1022448835522486273

वाचा : मोदींच्या बालपणावर आधारित लघुपटाचे राष्ट्रपती भवनात स्पेशल स्क्रिनिंग

‘सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या सिझनचे आठ भाग प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांना ते फार आवडले आहेत. नवाजुद्दीन आणि सैफच्या अभिनयाची प्रशंसा अनेकांकडून होत आहे.

Story img Loader