शहर असो किंवा गाव आता प्रत्येकाकडेच चार चाकी गाडी असते. कुठेही लांबच्या पल्याला जाणं असो किंवा अगदी कोपऱ्यावर मित्र- मैत्रिणींना भेटायला जाणं असो, अनेकजण आपले वाहन घेऊन जाणच पसंत करतात. यात अनेकांचा आविर्भाव हा पलिकडेच तर जायचं आहे… यासाठी सीट बेल्ट लावायची काय गरज? असाच असतो. पण हेच पाच मिनिटांचं अंतर आपल्याला आयुष्यापासून कायमच दूर नेऊ शकतात हेच अनेकांना उमजत नाही. अनेकदा ते कळतंही असतं पण वळत नाही. अभिनेते जयवंत वाडकरांनी मात्र ‘५ सेकंड’ या शॉर्ट फिल्ममार्फत एक वेगळाच संदेश दिला आहे. ‘विचित्र’ या प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या शॉर्ट फिल्ममध्ये सीट बेल्ट न लावण्याचे दुष्परिणाम अगदी समर्पकपणे मांडण्यात आले आहेत.

https://www.facebook.com/best.seconds.video.competitions/videos/1626890970738743/

जिकडे शब्द अपुरे पडतात तिकडे कृतीतूनच संदेश द्यावा लागतो हा तर भारताचा इतिहास आहेच. या शॉर्ट फिल्ममध्येही काहीसे असेच आहे. आतापर्यंत शासनाकडून सीट बेल्टची सक्ती करणारे अनेक नियम करण्यात आले. पण पालथ्या घड्यावर पाणी पडावे त्याप्रमाणेच अनेकजण आजही गाडी चालवताना हे नियम धाब्यावर बसवताना दिसतात. २ मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये कलाकारांच्या तोंडी एकही वाक्य नाही. पण तरीही या शॉर्ट फिल्ममधून दिला गेलेला संदेश लाखमोलाचा आहे. नक्की विचित्र टीम या शॉर्ट फिल्ममधून काय सांगू पाहत आहे हे जाणून घेण्यासाठी ही शॉर्ट फिल्म एकदा तरी पाहावीच लागेल.

भाग्येश, निखील आणि मोहित या तिघांनी ‘५ सेकंड’ या शॉर्ट फिल्मचे काम पाहिले आहे. ५ सेकंड या शॉर्खाच फिल्मची खासियत म्हणजे स्वित्झर्लंड येथील झ्यूरीक शहरातील ‘बेस्ट सेकन्ड्स शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन’मध्ये भारतातील काही शॉर्ट फिल्म आपले स्थान मिळवून आहेत. यात ‘५ सेकंड’ ही सध्या तिसऱ्या स्थानी आहे. सीट बेल्ट वापरणे किती अनिवार्य आहे हा सोशल मेसेज २ मिनिटांच्या शॉर्ट फिल्म द्वारेमार्फत रंजक आणि नाट्यमय पद्धतीने मांडण्यात आले आहे. आपल्या मातीतील फिल्म परदेशी जिंकावी अशी इच्छा ती फिल्म बनवणाऱ्या टिमची आहे,