बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली लग्नबंधनात अडकणार का, याविषयी प्रश्नचिन्हं कायम असलं तरीही काही गोष्टींकडे नीट लक्ष दिले तर ‘विरुष्का’च्या लग्नाच्या चर्चांवर विश्वास ठेवायला हरकत नाही असेच म्हणावे लागेल. विराट आणि अनुष्का इटलीला रवाना झाले असून तिथेच त्यांचा विवाहसोहळा पार पडेल असे म्हटले जातेय. त्यासाठी अनुष्का आणि तिचे कुटुंबीय परदेशात रवाना झाल्याचे समजते. पण, त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्तीसुद्धा इटलीच्या दिशेने रवाना झाल्याचे म्हटले जातेय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्काच्या कुटुंबियांसोबत एक भटजीसुद्धा इटलीला गेले आहेत. भटजी, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आणि कलाविश्वातील मित्रमंडळी या साऱ्यांची उपस्थिती पाहता आता ‘विरुष्का’चे शुभमंगल जवळपास नक्कीच असल्याची अनेकांना खात्री होऊ लागली आहे.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

वाचा : ओव्हल स्टेडियममध्ये विराट- अनुष्का अडकणार लग्नाच्या बेडीत?

काही महिन्यांपूर्वी विराट आणि अनुष्का सुट्टीच्या निमित्ताने उत्तराखंडला गेले होते. त्यावेळी सोशल मीडियावर त्यांचे काही फोटोही व्हायरल झालेल होते. ज्या फोटोंमधील एका फोटोत तेथील एक भटजीही दिसत होते. तेच भटजी गुरुवारी मध्यरात्री अनुष्काच्या कुटुंबियांसोबत दिसल्याचे म्हटले जातेय. अनुष्का मुंबईतून आणि विराट दिल्लीहून त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघाले असून आता येत्या काळात त्यांच्याविषयीची कोणती नवी माहिती सर्वांसमोर येते याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानमतर विराट आणि अनुष्का त्यांच्या नात्यात नव्या इनिंगची सुरुवात करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे.