बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण नुकतेच मुकेश अंबानी यांनी दिलेल्या पार्टीत हातात हात घालून फिरताना दिसले. त्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप वैगेरे होणार आहेत अशा बातम्यांना पूर्ण विराम दिला. अंबानी यांच्या इथे झालेल्या पार्टीत रणवीरने काळ्या रंगाचा सूट घातला होता, तर दीपिकाने गोल्डन बॉर्डरची साडी नेसली होती. दोघांच्या या वेशभूषेकडे सगळ्यांचेच लक्ष होते. त्यात ते सतत एकत्र दिसत असल्यामुळे साऱ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या.

या पार्टीनंतर दोघंही एकत्र दुबईला गेले. दुबईला जातानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअरही केले. या दोन घटनांच्याआधी दीपिका आणि रणवीरमध्ये वादच होत होते अशा बातम्या सतत येत होत्या. सिनेवर्तुळात अशाही चर्चा होत्या की या दोघांमध्ये कधीही न जाणारा दुरावा आला आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार असे मानले जात होते की, रणवीरने बेफिक्रे सिनेमा, यामुळेच त्यांच्यात दुरावा यायला लागला.

या वृत्तात सांगितले आहे की, बेफिक्रेचा दिग्दर्शक आदित्य चोप्राने रणवीरला सांगितले होते की, दीपिकासोबतच्या त्याच्या प्रेमसंबंधांवर थोडा आळा घालायला सांगितले होते. लोकांचे लक्ष त्या दोघांवरुन निघून सिनेमावर जाईल असा विचार आदित्यने केला. बेफिक्रे सिनेमात त्याची व्यक्तिरेखाही मनमुराद जगणारा आणि जीवनाचा आनंद घेणारा मुलगा अशी आहे. आदित्यने सांगूनही रणवीरला तसे वागणे फारसे जमले नाही. तिच्यासाठीचे प्रेम तो लपवू शकला नाही. यामुळे त्यांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांचे एकत्र फोटो पाहायला मिळाले.

बेफिक्रेनंतर रणवीर संजय लीला भन्साळीच्या पद्मावती सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो अलाउद्दीन खिलजी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. या सिनेमासाठी तो खूप उत्साही आहे. या सिनेमातल्या त्याच्या व्यक्तिरेखेसाठी तो फार मेहनत घेताना दिसत आहे. रणवीरला त्याच्या करिअरलमधली अलाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारणे सगळ्यात कठीण वाटते. त्याच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत केलेल्या सिनेमांपेक्षा हा सिनेमा खूप कठीण आहे.

भन्साळी यांचा हा सिनेमा खिलजी वंशाच्या अलाउद्दीन खिलजी यांच्यावर आणि मेवाडची राणी पद्मावतू यांच्यातल्या प्रेमावर आधारलेला आहे. राणी पद्मावतीही तिची सुंदरता, बुद्धी आणि साहसासाठी ओळखली जायची. रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे तर पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे.