केवळ पाच वर्षांतच चित्रपटसृष्टीत तिनं आपलं स्थान भक्कम केलं. स्टारकिड असली तरी दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. डान्स, अभिनय आणि कमी वयात पटकावलेल्या अभूतपूर्व यशामुळे आज ती तरुणांच्याच नव्हे तर ज्येष्ठांच्याही गळ्यातील ताईत झाली आहे. आम्ही बोलत आहोत, करणची लाडकी ‘स्टुडंट’ आलिया भट्ट हिच्याबद्दल. आज तिचा २५वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच तिने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे.

मुलीच्या वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांनीदेखील ट्विटरवर आलियासाठी एक खास संदेश लिहिला आहे. यातील महेश भट्ट यांच्या मिठीतल्या चिमुकल्या आलियाचा फोटो विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘छोट्याशा परीची एवढी मोठी किमया,’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. महेश भट्ट हे प्रसिद्ध दिग्दर्शक असले तरी आलियाने तिच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले हे सर्वांनाच ठाऊक आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक किस्सा सांगितला. पहिला चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इयर’ बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर आलियाने वडिलांना एक ऑटोग्राफ दिला होता. ‘न केलेल्या मदतीसाठी तुमचे खूप आभार,’ असं त्या चिठ्ठीत आलियाने लिहिलं होतं. तिची हीच चिठ्ठी माझा सर्वांत मोठा खजिना असल्याचं महेश भट्ट अभिमानानं सांगतात.

वाचा : अभिनय नव्हे, तर ‘या’ श्रेत्रात करिअर करण्याचा श्रीदेवी यांच्या मुलीचा निर्णय 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी ‘राझी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे दोन फोटो तिने इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचा २५वा वाढदिवस असल्याने शूटिंगच्या २५व्या दिवसाचे हे दोन फोटो असून आजपासून २५व्या दिवशी म्हणजेच ९ एप्रिल रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया यात भारतीय लष्कराला गुप्त माहिती पुरवणाऱ्या पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.